• सूर्य मावळेल, पण समृद्ध गावाचं स्वप्न नाही !


    चंद्रप्रकाश पुरेसा असतो, जेव्हा ध्येय असतं उजेडाचं… अंधार दाटत असला तरी, ग्रामविकासाची मशाल तेजाने प्रज्वलित राहते. रात्री ८.३० वाजता सावर्डे ग्रामपंचायतीत झालेली ग्रामसभा म्हणजे लोकसहभाग, निर्धार आणि प्रशासनाची खरी ओळख. सकाळी ७ वाजता सुरू झालेला प्रवास, ८ ते ९ ग्रामपंचायतींचा दौरा, आणि तरीही संध्याकाळीही तीच ऊर्जा, तीच बांधिलकी — मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) आणि त्यांच्या टीमकडून! गावकऱ्यांचा उत्साह, एकतेचा भाव आणि समृद्ध गावाचं स्वप्न यामुळे ग्रामसभा झाली परिवर्तनाची प्रेरणा. रात्रभर ग्रामपंचायत भवनात मुक्काम करून प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वासाची नाळ अधिक मजबूत झाली. जेव्हा काम हे सेवा बनतं, तेव्हा अंधारही पहाट बनतो.

  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान


    "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" या शासनाच्या महत्वकांक्षी पुरस्कार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावरील कार्यशाळा दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी मौजे आरवडे तालुका तासगाव येथे सरपंच / उपसरपंच / ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी , ग्रामपंचायत अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक , डाटा एन्ट्री ऑपरेटर (सर्व) ग्रामपंचायत व सर्व खाते प्रमुख व पर्यवेक्षक अधिकारी, यांच्याकरिता प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करून या अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणेत आली. सदर कार्यशाळेस मा. आमदार रोहित सुमन आर. आर. पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

  • घरकुल शुभारंभ


    मतकुणकी घरकुल शुभारंभ मा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम मा गट विकास अधिकारी श्री किशोर माने साहेब सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ याच्या उपस्थितीत करणेत आला